दमदार पावसाच्या आगमनाने रोप लावणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:52+5:302021-07-14T04:29:52+5:30

शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. पावसाचे पुनरागमन ...

With the arrival of heavy rains, the planting of seedlings accelerated | दमदार पावसाच्या आगमनाने रोप लावणीस वेग

दमदार पावसाच्या आगमनाने रोप लावणीस वेग

googlenewsNext

शित्तूर-वारुण :

शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. पावसाचे पुनरागमन झाल्याने खोळंबलेल्या भात रोप लावणीला वेग आला आहे. परिसरात सगळीकडे रोप लावणीची धांदल उडाली असून शेतशिवारे माणसांच्या गर्दीने फुलली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजास पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

शित्तूर-वारुण परिसरामध्ये भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. उखळू, शित्तूर-वारुण, विरळे, जांबूर, कांडवण या परिसरात रोप पद्धतीने भाताची लावण केली जाते. यावर्षी तरव्यांची उगवण ही समाधानकारक होऊन देखील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे परिसरातील भाताच्या रोप लावणी खोळंबल्या होत्या. आता पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने रोप लावणीस वेग आला आहे. एकाचवेळी सगळ्यांची रोप लावण सुरू असल्याने व मजुरांची कमतरता भासत असल्याने पैरा पद्धतीने रोप लावण करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

१३ शित्तूर वारुण भातशेती

फोटो :

शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने खोळंबलेल्या रोप लावणीच्या कामांना वेग आला आहे. शेत-शिवारात बैलांच्या औताच्या सहाय्याने चिखल करताना शेतकरी (छाया : सतीश नांगरे)

Web Title: With the arrival of heavy rains, the planting of seedlings accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.