चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:15+5:302021-07-28T04:26:15+5:30
दोडामार्गे आलेल्या या टस्कराने सडेगुडवळे येथील प्रभावती प्रकाश शिंदे यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनविभागाच्या ...
दोडामार्गे आलेल्या या टस्कराने सडेगुडवळे येथील प्रभावती प्रकाश शिंदे यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी करून वनपाल भरत निकम, वनपाल दयानंद पाटील, वनमजूर सानप, होगणे, गावडे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे केले.
टस्कर हत्तीने हेरे येथील कुडाटेक नावाच्या जंगलात आश्रय घेतला असून सायंकाळी सात वाजल्यानंतर टस्कर बाहेर पडून नुकसान करीत आहे.
टस्कर रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येत असल्याने गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, घराजवळ मिरचीचा धूर करावा तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना करून हत्ती दिसताच त्याला दगड, काठीने मारून बिथरवू नये, असे आवाहन चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी केले आहे.
फोटो ओळी : सडेगुडवळे (ता. चंदगड) येथे टस्कर हत्तीने प्रभावती शिंदे यांच्या भातपिकाचे केलेले नुकसान. दुसऱ्या छायाचित्रात टस्कर हत्तीसह आणखी हत्ती सोबत दिसत आहेत.
क्रमांक : २७०७२०२१-गड-१३/१४