मागणी वाढली । अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानदारांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:54 AM2020-05-31T10:54:51+5:302020-05-31T10:55:35+5:30

कोरोनाच्या या कालावधीत ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे.

Arsenic album sells at a hefty rate | मागणी वाढली । अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानदारांची चौकशी सुरू

मागणी वाढली । अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानदारांची चौकशी सुरू

Next
ठळक मुद्दे‘आर्सेनिक अल्बम’ची चढ्या दराने विक्री


कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने ह्यआर्सेनिक अल्बम ३०ह्ण या होमिओपॅथी औषधाची शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली असून, काही दुकानांमधून अव्वाच्या सव्वा दराने ही औषधे विकली जात आहेत. याची चौकशी अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केल्याचे सांगण्यात आले.

कोरोनावर अजूनही लस सापडली नसताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने वरील औषधाची शिफारस केली आहे. होमिओपॅथीच्या दुकानांमध्ये हे औषध घेण्यासाठी गर्दी होत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना सरसकट वितरण सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्यामध्ये एक हजाराहून अधिक डॉक्टर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात. कोल्हापूरमध्ये केवळ होमिओपॅथीच्या औषधांची विक्री करणारी १५ ते २० दुकाने आहेत.

कोरोनाच्या या कालावधीत ह्यआर्सेनिक अल्बम ३०ह्ण औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे. परंतु वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशा पद्धतीने औषध देणे अयोग्य असल्याचेही मत व्यक्त होत आहे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती तपासून डॉक्टर औषधाची मात्रा ठरवतात व औषध देतात. मात्र अशा पद्धतीने सरसकट औषध वितरण धोकादायक ठरू शकते, असे सांगण्यात आले.
 

 

नागरिकांकडून प्रमाणापेक्षा अधिक मागणी वाढल्याने आणि साठा कमी असल्याने अनेक ठिकाणी २० रुपयांचे हे औषध आता ५०, १०० रुपयांनाही विकले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.आम्ही रुग्णांसाठी नियमितपणे आर्सेनिक अल्बम औषध वापरतो. ताप, सर्दी, खोकल्यासाठी, तसेच सांसर्गिक आजारासाठी हे औषध वापरले जाते. आयुष मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या औषधाची शिफारस केल्यामुळे मागणी वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा पद्धतीचे सरसकट औषध घेणे अयोग्य आहे. 
- डॉ. हर्षवर्धन जगताप, अध्यक्ष, 
न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन, कोल्हापूर


 

Web Title: Arsenic album sells at a hefty rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.