Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:45 AM2019-10-14T05:45:31+5:302019-10-14T05:46:37+5:30

अमित शहा; कोल्हापुरात महायुतीच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीकेचा भडिमार Maharashtra Election 2019 :

article 370 canceled due to 56-inch Modi : Amit shah in kolhapur | Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द

Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द

Next

कोल्हापूर : विकासाची कामे काय होतील-राहतील; पण काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत ५६ इंच छातीवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखविली. हे कलम रद्द झाल्यानंतरची देशातील ही पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीला विजयी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले. रखरखत्या उन्हातही सभा झाली.
महापुरात कोल्हापूर-सांगलीचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करून ही दोन्ही शहरे आम्ही सुंदर बनवू, असे आश्वासनही शहा यांनी दिले.


कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा असली तरी शहा यांनी ३७० कलम, तिहेरी तलाक, राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक यांवरच जास्त काळ भूमिका मांडली. ‘जय भवानी... जय शिवाजी...’चा गजर करतच त्यांनी भाषणाला सुरुवात केली. येथील तपोवन मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.


शहा म्हणाले, ‘मोदी-फडणवीस की राहुलबाबा-शरद पवार यांच्यापैकी तुम्हाला कुणाची निवड करायची आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देशात आजपर्यंत एवढी सरकारे आणि इतके पंतप्रधान आले आणि गेले; परंतु त्यांच्यात काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत नव्हती. काश्मीरला भारताला जोडण्याची प्रक्रियाच काँग्रेसने रोखली होती.


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हे स्पष्ट आहे. शरद पवार यांना पराभवाची छाया दिसू लागल्यामुळेच ते विचित्र हातवारे करू लागले आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असे शोभत नाही. त्यांच्या पायांखालची वाळू घसरली आहे. पवार यांना नाही तर मग काय अशोक चव्हाण यांना टार्गेट करावे की काय?

खुर्चीसाठी तारांबळ
राजकीय नेता असो की कार्यकर्ता; त्याला खुर्ची हवी असते. फरक इतकाच असतो की, कार्यकर्त्याला ती बसण्यासाठी आणि नेत्यांना सत्तेसाठी हवी असते. कोल्हापुरात रविवारी अमित शहा यांच्या सभेसाठी ऐनवेळी आणखी खुर्च्या मागवाव्या लागल्या.

शिवसेनेकडे दुर्लक्ष
ही सभा महायुतीची असल्याचे जाहीर केले असले तरी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता. शिवसेनेचे दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने व दोन आमदार या सभेकडे फिरकले नाहीत. व्यासपीठावरील फलकावर उद्धव ठाकरे यांचेही चित्र नव्हते. महायुतीतील रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती पक्षाचाही नेता सभेकडे फिरकला नाही.

Web Title: article 370 canceled due to 56-inch Modi : Amit shah in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.