गुरुंचे विचार गायकीतून समृद्ध करणारा कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:15+5:302021-02-08T04:22:15+5:30

पंडित देशपांडे म्हणाले, डिग्रजकर यांनी ज्या कष्टाने विद्या प्राप्त केली आहे. त्यातही पंडित निवृत्ती बुवा आणि सुधाकरबुवा यांच्यासारखे गुरू ...

An artist who enriches Guru's thoughts through singing | गुरुंचे विचार गायकीतून समृद्ध करणारा कलाकार

गुरुंचे विचार गायकीतून समृद्ध करणारा कलाकार

Next

पंडित देशपांडे म्हणाले, डिग्रजकर यांनी ज्या कष्टाने विद्या प्राप्त केली आहे. त्यातही पंडित निवृत्ती बुवा आणि सुधाकरबुवा यांच्यासारखे गुरू मिळणे कठीण बाब होती. त्याच्या तालमीत तयार झालेल्या अशा कलाकाराचा माझ्या हस्ते आणि तोही देवल क्लबच्या माध्यमातून गौरव होत आहे. यासारखा आनंद नाही. यानिमित्त त्यांनी त्यांचे गुरु पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, वडील वामनराव देशपांडे व जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, किराणा, आदी घराण्यांतील दिग्गजाच्या प्रसंगानुरूप बंदीश राग, जलद धुव्र मंडळ, सरस्वती गान आदी सादर केले.

सत्काराला उत्तर देताना डिग्रजकर म्हणाले, गायन समाज देवल क्लबतर्फे व आबासाहेबांसारख्या दिग्गजांचा पुरस्कार मिळणे माझे भाग्य समजतो. हा पुरस्कार मी माझ्या गुरुजनांना समर्पित करत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीताचा सेवा मी करणार, अशी ग्वाही यानिमित्त त्यांनी दिली. त्यांनीही सरस्वती राग, ललिता गौरी आदींचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक श्रीकांत डिग्रजकर यांनी केले. यावेळी देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित, खजानिस राजेंद्र पित्रे, मुजुमदार घराण्याचे बाळासाहेब देशपांडे, डाॅ. आशुतोष देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : ०७०२२०२१-कोल- रसिकराज पुरस्कार

आेळी : कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील राम गणेश गडकरी सभागृहात रविवारी देवल क्लबतर्फे ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते पंडित विनोद डिग्रजकर यांचा सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब देशपांडे, सचिन पुरोहित, राजेंद्र पित्रे उपस्थित होते.

(छाया : नसीर अत्तार)

Web Title: An artist who enriches Guru's thoughts through singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.