कलाविषयक वाढीव गुण मार्च २0१७ पासूनच

By admin | Published: March 18, 2017 06:56 PM2017-03-18T18:56:17+5:302017-03-18T18:56:17+5:30

सुधारित आदेश : यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यानाही लाभ

Artistic enhancement marks since March 2017 | कलाविषयक वाढीव गुण मार्च २0१७ पासूनच

कलाविषयक वाढीव गुण मार्च २0१७ पासूनच

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : शास्त्रीय संगीत कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यात घेतला होता, परंतु हा लाभ मार्च २0१७ पासूनच म्हणजे आत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यानाही मिळणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
दहा वर्षे अस्तित्वात असलेल्या, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या व तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर केलेल्या संस्थांतून शास्त्रीय कलेची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य मानण्यात येणार आहे. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांने प्राप्त केलेले असल्यास, विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल. सर्व प्रकारच्या वाढीव गुणांचा विद्यार्र्थ्याना प्रवेशासाठी फायदा होणार आहे.
शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये या विद्यार्थ्याने कमीत कमी पाच वर्षाचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे, मान्यताप्राप्त संस्थांच्या तीन पीरक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास, दहा गुण व पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालणार आहे. शास्त्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक, शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जाणार आहेत. परंतु अशा विद्यार्थ्यांस पहिला निर्णय लागू राहणार नाही.
आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५0 प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यांस १0 गुण, तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकाणाऱ्या विद्यार्थ्यांस अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.
चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण, बी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना १0 गुण तर सी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना ५ गुण वाढीव दिले जातील. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या २ टक्के आरक्षणामध्ये प्रवेशासाठी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन या कला प्रकारात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.
लोककला क्षेत्रातील अभ्यासक, संस्था व मंडळे यांच्याकडून लोककलासंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या चार परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस २0 वाढीव गुण आणि तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

Web Title: Artistic enhancement marks since March 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.