कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:11 PM2020-09-04T21:11:20+5:302020-09-04T21:13:37+5:30

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.

Artists block Pune-Bangalore National Highway | कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी यासाठी कलाकार महासंघाच्यावतीने शिरोली येथे महामार्ग रोखला .

Next
ठळक मुद्देकलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार

शिरोली- राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर शिरोली पुलाची दर्ग्याजवळ कलाकारांच्या विविध  मागण्यासाठी कलाकार महासंघाच्यावतीने रास्तारोको करण्यात आला  यावेळी शिरोली पोलिसांनी त्याना ताब्यात घेवून सुटका केली.

यावेळी कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्यातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे म्हणाले की देशासह राज्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट आले असताना त्यातुन सावरण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. पण या संकटामुळे कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कलाकाराना आर्थिक मदत शासने द्यावी यासाठी आजपर्यंत प्रधानमंत्री , मुख्यमंत्री , मंत्री , खासदार यांना वेळोवेळी  निवेदन देवून ही शासन कलाकारांच्या पाठीशी उभाराहत नसेल तर विधान भवनासमोर ४ ऑक्टोबर रोजी आक्रोश आंदोलन छेडण्याचा  इशारा मोरे दिला आहे.

कलाकार आपली कला सादर करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो गेल्या वर्षभरात कलाकारांच्यावर अनेक संकटे आली आणि आता जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्याने देशासह राज्यात लॉकडाउन जाहीर झाले आणि यात्रा जत्रा लग्नसंमारंभ व आता गणेश उत्सव वाया गेला. सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले कलाकार घरातच बसून प्रशाषणाला मदत करीत राहिला. कलाकारांची कला सादर झाली तरच त्यांच्या कुटुंबाच पोट भरतं.

गेले ६ महिने कलाकार व मालक घरीच बसून राहिल्याने कलाकार व मालक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता अनलॉक सुरू झाले असुन जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. मग आमचा व्यवसाय का बंद आमचा व्यवसायला ही परवानगी द्यावी. अशी वारंवार मागणी करूनही सरकार कलाकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. याचा निषेध करत कलाकारांनी महामार्ग रोखला. पोलिसांनी विरोध केल्यानंतर काही आंदोलकांनी रस्त्यावर झोपले होते. आमच्या अंगावर वाहने घाला, पण आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलक कार्यकर्त्यांना हटवले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, अनिता पाटील, राम कुंभार, विश्वास ढाले, उमर मुल्ला, शोभा पाटील, विकास साठे, महेश कदम, सात्तापा पाटील, सुनिल पाटील, उमेश अवघडे, विजय गावडे, गिरीश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

रामचंद्र जाधव, गिरीधर इंगोले, उदयराज पोवार, महेश कदम, संदिप साठे,अनिल वागवेकर, उमेश अवघडे, सुनिल पाटील,आश्रापा कांबळे, विजय गावडे,सातापा पाटील,विकास साठे, गिरीश कांबळे, नागराज पाच्छे,एम एस कांबळे, कलापथक निर्माते मुकूंद सुतार,ऊमर मुल्ला,रजनी गोरड,शोभा पाटील,हिलगे वहिणी,अमित पाटील किशोर भारती,कुमार घोरपडे,तुषार गोसावी,वर्षा धुमाळ,उदय कांबळे सातार्याचे सुनिल कांबळे,प्रशांत साठे शिवाजी पोवार, रामचंद्र भिमराव जाधव, सुरेश वारे , सुनिल नागरपोळे , सचिन आवळे ,सागर साठे , सुनिल कोरवी सागर गेजगे ,अक्षय देसाई ,प्रकाश जाधव , युवराज जाधव, इत्यादी कलाकार उपस्थित होते.
शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, रमेश ठाणेकर,अतुल लोखंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते.

 

Web Title: Artists block Pune-Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.