‘इंद्रधनुष्य’साठी कलाकारांचा संघ सज्ज
By admin | Published: November 4, 2014 12:28 AM2014-11-04T00:28:28+5:302014-11-04T00:52:43+5:30
शिवाजी विद्यापीठ : ४० जणांचा सहभाग; आज होणार अमरावतीला रवाना
कोल्हापूर : विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य युवा महोत्सवा’साठी शिवाजी विद्यापीठाचा संघ उद्या, मंगळवारी रवाना होणार आहे. त्याच्या तयारीसाठी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवनात आज, सोमवारी दिवसभर संघातील कलाकारांचा सराव रंगला होता.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवार (दि. ५)पासून ‘इंद्रधनुष्य युवा महोत्सवा’ला सुरुवात होणार आहे. यामध्ये लोकनृत्य, सुगम गायन, समूहगीत, लोककला, लोककला वाद्यवृंद, अशा २४ कला प्रकारांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ४० कलाकारांचा संघ सहभागी होणार आहे. त्यांचा विद्यापीठात आठवडाभर सराव सुरू होता. आज दिवसभर कलाप्रकारनिहाय तालीम रंगली होती. त्यातून तयारीची चाचणीदेखील घेण्यात आली.
या संघात अश्विनी वडगावे, कुणाल मसाले (केडब्ल्यूसी सांगली), गीता कुलकर्णी, ऋषिकेश देशमाने, रोहित पाटील, अरविंद कडोले, प्रितेश रणनवरे, पूर्वा कोडोलीकर, बाहुबली राजमाने, अशांत मोरे (विवेकानंद कॉलेज), मृणालिनी पाठक, चैतन्य देशपांडे, जयदेव भालेराव (डी.जे. कॉलेज सातारा), सोहम केळकर, मेधा मण्णूर, वरूण देशपांडे (विलिंग्डन कॉलेज सांगली), श्रेयस मोहिते, सलिम मुल्ला (शिवाजी विद्यापीठ), स्वराली लोटेकर (एलबीएस सातारा), दिगंबर साठे, निखिल साळुंखे (दे. आ. महाविद्यालय चिखली), प्रसाद लोहार, नीलेश गोलगिरे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर), नम्रता मोटे, प्रणिती शिंदे (पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), मिताली पाटील (एएससी पलूस), अंकिता कांबळे (मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली), अमित शिंदे (किसनवीर महाविद्यालय, वाई), सुमित वाघ (नाईट कॉलेज, कोल्हापूर), किरण ढाणे, प्रियांका पाटील, भाग्यश्री कालेकर, सत्यजित साळुंखे, अमित माळकरी यांचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत कोकरे, डॉ. संगीता पाटील या संघप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)