Kolhapur: हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:16 PM2024-02-02T12:16:46+5:302024-02-02T12:17:10+5:30
हातकणंगले : हातकणंगले शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वा. त्यांच्या घरी ह्द्यविकाराने वयाच्या ४५ व्या ...
हातकणंगले : हातकणंगले शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वा. त्यांच्या घरी ह्द्यविकाराने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. डिसेंबर २०१९ च्या पहिल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्यापूर्वीच त्यांची मनाला चटका लावणारी एक्झिट (मूत्यू) झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. ते माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार राजू बाबा आवळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.
२०१९च्या नगरपंचायत निवडणूकीत ते एकमेव काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार होते. १७ नगरसेवकामध्ये भाजपा. शिवसेना, अपक्षाना ते गेली चार वर्ष समान न्याय देवून शहाराच्या विकासासाठी धडपड करत होते. त्यांच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान होणार आहे. सर्वाना जीव लावणारे, मनमिळावू, सर्वाना राजकारण वितरीत बरोबर घेवून जाणारे नगराध्यक्ष अशी त्यांची गेल्या चार वर्षात ओळख होती .