अरुण नरकेंना निवडणूक लढवण्याचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:40+5:302021-03-25T04:24:40+5:30

कोल्हापूर : दूध संघाचे अनेक वर्षे नेतृत्व करणारे अरुण नरके यांनीच पुन्हा रिंगणात उतरावे, असा आग्रह माजी आमदार महादेवराव ...

Arun Narake urged to contest elections | अरुण नरकेंना निवडणूक लढवण्याचा आग्रह

अरुण नरकेंना निवडणूक लढवण्याचा आग्रह

Next

कोल्हापूर : दूध संघाचे अनेक वर्षे नेतृत्व करणारे अरुण नरके यांनीच पुन्हा रिंगणात उतरावे, असा आग्रह माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी धरल्याचे सांगण्यात येेतेे. याच बरोबर जोरकस ताकद लागण्यासाठी हातकणंलेमधून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचा विचार पुढे आला आहे.

करवीर तालुक्यातील विश्वास पाटील, जयश्री पाटील चुयेकर हे दोन सत्तारूढ संचालक विरोधी तंबूत गेल्यामुळे आता आमदार पी. एन. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हणूनच आता पी. एन. यांच्याकडे राजेशला रिंगणात उतरवण्याचा आग्रह धरला जात आहे.

अरुण नरके हे सलग दहा वर्षे ‘गोकुळ’चे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात दूध संघाने एक वेगळी भरारी घेतली. ७५ वर्षे उलटलेल्या नरके यांनी यंदाच्या निवडणुकीत आपण उमेदवार नसून, त्याऐवजी चेतन उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे; परंतु गेल्या आठवडाभरातील घडामोडीनंतर आता चेतनऐवजी पुन्हा अरुण नरके यांनीच रिंगणात उतरावे, असा आग्रह महाडिक यांनी धरल्याचे समजते. आनंदराव पाटील चुयेकरांची जिल्ह्यात जी प्रतिमा आहे, तशाच पद्धतीने नरके यांनीही त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून जिल्ह्यात छाप पाडली आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या संघाच्या संपर्क मेळाव्यांच्या निमित्ताने नरके यांनी प्रत्येक तालुक्यात आपल्या रोखठोक मतांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. म्हणूनच सत्तारूढ गटातील सहा संचालकांनी सोडचिठ्ठी दिली असताना नरके यांनी चेतनऐवजी स्वत: पुन्हा रिंगणात उतरावे, असा आग्रह आहे.

चेतन नरके यांच्यासाठी करवीर, पन्हाळा तालुक्यातील त्यांना मानणारे ठरावधारक प्रामुख्याने पॅनेल टू पॅनेल एकनिष्ठ राहणार असतील तरीही जिल्हाभर नरके यांच्या प्रतिमेचा उपयोग होईल, असा सत्तारूढांना विश्वास आहे.

चौकट

नेते झाले अतिदक्ष

सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते हे आवारात उपस्थित होते. सातपुते यांना तेथे पाहून अनेकांनी त्यांना विचारणाही केली. याची अखेर आमदार पी. एन. पाटील यांनी दखल घेतल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यांनी सातपुते यांना दुपारी गॅरेजवर बोलावून मार्गदर्शन केले.

Web Title: Arun Narake urged to contest elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.