श्री सिद्धेश्वर यात्रेतील महिला कुस्ती स्पर्धेत आर्या नवनाळे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:15+5:302021-03-17T04:24:15+5:30
कोल्हापूर : श्री क्षेत्र नेज (ता. चिक्कोडी. जि. बेळगाव) येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये कुस्ती ...
कोल्हापूर : श्री क्षेत्र नेज (ता. चिक्कोडी. जि. बेळगाव) येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये कुस्ती मैदान घेण्यात आले. त्यातील महिला कुस्ती स्पर्धेत इचलकरंजीतील महिला कुस्तीपटू आर्या नवनाळे (तालीम चंदूर) हिने पुणेच्या सोनाली चव्हाण हिला लाटणे डावावर चितपट करून विजय मिळविला. तिला महिला सरपंच केशरी किताब आणि दोन किलो चांदीची गदा इचलकरंजी येथील जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी आप्पासो आवळे, नगरसेवक अब्राहम आवळे, डब्बल नरसिंह केशरी पैलवान सचिन पुजारी, वडील ललित नवनाळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय किसनराव आवळे यांनी इचलकरंजीतील मुलींनी कुस्ती क्षेत्रात करिअर करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यातून प्रेरणा घेऊन आर्या ही कुस्ती क्षेत्रात कार्यरत आहे.
फोटो (१६०३२०२१-कोल-आर्या नवनाळे (कुस्ती) : इचलकरंजी येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेती आर्या नवनाळे हिला आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी डावीकडून ललित नवनाळे, आप्पासो आवळे, अब्राहम आवळे, सचिन पुजारी उपस्थित होते.