मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री सीपीआरला अचानक भेट

By संदीप आडनाईक | Published: October 9, 2023 05:58 AM2023-10-09T05:58:14+5:302023-10-09T06:00:46+5:30

नांदेड येथील मृत्युच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णालयाल तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

As soon as the Chief Minister's order came, the district administration woke up; Collector's sudden visit to CPR at midnight | मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री सीपीआरला अचानक भेट

मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री सीपीआरला अचानक भेट

googlenewsNext

कोल्हापूर : नांदेड येथील मृत्युच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णालयाल तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी मध्यरात्री सीपीआरला अचानक भेटी देऊन पाहणी केली आणि आढावा घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या होत्या.

या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी रात्री साडेअकरा वाजता अचानक सीपीआरला भेट दिली. यावेळी सुपरिडेंटसह नर्स व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोयना, दूधगंगा, प्रसूती, नवजात शिशू विभाग, हृदय रोग विभाग, ऑक्सिजन विभाग अपघात याची पाहणी केली. नातेवाईकांची चौकशी करून मातेला व बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसेच प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी करून सूचना केल्या. यानंतर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी विविध विभागांची माहिती घेत होते. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधे आहेत का याची चौकशी करून खातरजमा करत होते. यावेळी रात्रपाळीच्या वैद्यकीय अधिकार्यानी  रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. 

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या.  सतर्क राहून रुग्णांची सेवा करावी, प्रत्येक आरोग्य केंद्रातील औषध साठा पुरेसा आहे, याची खात्री करावी, औषध साठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी, औषध साठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: As soon as the Chief Minister's order came, the district administration woke up; Collector's sudden visit to CPR at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.