Kolhapur- शिक्षणाचा परीघ: भुदरगड तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:22 IST2025-02-05T19:18:56+5:302025-02-05T19:22:09+5:30

शिवाजी सावंत गारगोटी : भुदरगड तालुका हा शैक्षणिक उपक्रमांसाठी राज्याला ‘दीपस्तंभ’ आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन राज्याला पथदर्शी ...

As the educational graph of Bhudargarh taluka kolhapur rises | Kolhapur- शिक्षणाचा परीघ: भुदरगड तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावताच

Kolhapur- शिक्षणाचा परीघ: भुदरगड तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावताच

शिवाजी सावंत

गारगोटी : भुदरगड तालुका हा शैक्षणिक उपक्रमांसाठी राज्याला ‘दीपस्तंभ’ आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन राज्याला पथदर्शी प्रकल्प सादर करण्यात हा तालुका अग्रेसर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्यापासून सुरू झालेला हा शिक्षण यज्ञ तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संपत गायकवाड यांच्यापासून ते विद्यमान गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्यापर्यंत चढता आलेख उंचावत गेला आहे. दर्जेदार आणि नानाविध व्यावसायिक शिक्षण संस्थांनी तालुका स्वयंपूर्ण आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात ठसा उमटविला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा या स्पर्धेत टिकून आहेत. प्राथमिक शाळांतील पटसंख्या तुलनेने घटली असली तरी दर्जाच्या बाबतीत पुढारलेली आहे.

शैक्षणिक परिघाचा मागोवा घेताना मैलाचा दगड ठरलेल्या मौनी विद्यापीठाचे योगदान फार मोठे आणि मोलाचे आहे. या विद्यापीठात जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांना आणून मौनी विद्यापीठात बीए, बीएड, इंजिनिअरिंग, डीएड कॉलेज, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, आयसीआरई यासारख्या अनेक शाखा सुरू केल्या. त्यामध्ये सध्याच्या विश्वस्तांनी भर घातली आहे.

अनुदानित महाविद्यालयांमध्ये घटत चाललेली विद्यार्थी संख्या चिंताजनक आहे. याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. 

शैक्षणिक उपलब्धता

  • १ ते १२ वी विद्यार्थीसंख्या -२१,५३१
  • प्राथमिक शाळा १६३
  • माध्यमिक शाळा ४३
  • उच्च माध्यमिक शाळा १२
  • इंग्रजी माध्यमाच्या शाळा १४
  • शिक्षणशास्त्र महाविद्यालय ३
  • अध्यापक विद्यालय २
  • औषधनिर्माणशास्त्र विद्यालय १
  • ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर १
  • नर्सिंग महाविद्यालय १
  • नर्सिंग कॉलेज १
  • कृषी महाविद्यालय १
  • इंजिनिअरिग महाविद्यालय ३
  • इंजिनिअरिंग पदवी कॉलेज १
  • व्होकेशनल १
  • आयटीआय शासकीय १
  • आयटीआय खासगी २
  • कौशल्य विकास संस्था २
  • सीबीएसई १

सध्याची शिक्षणप्रणाली नवीन शैक्षणिक धोरणात, शिक्षण हक्क कायद्यात व शासनाच्या परिपत्रकात खूप आश्वासक वाटते. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणीतील अप्रामाणिकपणा, यंत्रणेतील त्यागी, समर्पणशील वृत्तीने काम करणाऱ्यांची कमतरता, दिवसेंदिवस कमी होत जाणारी वित्तीय तरतूद, शैक्षणिक नियोजनावर अतिक्रमण करणारे व वेळी-अवेळी येणारे उपक्रम यामुळे अपेक्षित फलनिष्पत्ती देण्यास असमर्थ ठरत आहे. - दीपक मेंगाणे, गटशिक्षणाधिकारी

Web Title: As the educational graph of Bhudargarh taluka kolhapur rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.