फाँड्री उद्योग अडचणीत, कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:20 PM2022-02-04T18:20:49+5:302022-02-04T18:21:39+5:30
फाँड्रीला लागणारे पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर गगनाला भिडले
सतीश पाटील
शिरोली : फाँड्रीला लागणारे पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर गगनाला भिडले असून,एक वर्षात दुप्पट दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे फाँड्री उद्योग अडचणीत आला आहे.
पिग आयर्न प्रति टन ६० हजार च्या घरात पोहचले आहे,एस जे स्क्रॅप ४४ हजार, कोळसा ५४ हजार,स्टील ४२हजार इतकी मोठी वाढ झाली असुन फेब्रुवारी महिन्यात आणखी प्रति टन दोन ते तीन हजार रुपये वाढ होणार असल्याचे ट्रेडर्स आणि उद्योजकांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी जानेवारी २०२१ मध्ये पिग आयर्न ३८ ते ४० हजार, स्क्रॅप ३८ ते ४० हजार, कोळसा ३२ हजारांवर दर होते. एक वर्षात दर जवळपास दुप्पटीच्या घरात गेले आहेत.त्यामुळे फौड्री उद्योग अडचणीत आले आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट आहेत मागणी ही ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे.असे असताना ही प्रत्येक महिन्याला पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर वाढत आहेत. उद्योजकांच्या मते ही मार्केट पाॅलीसी आहे या कोणताही आधार नाही.उद्योजकांना लुबाडणूक करण्याचे काम सुरू आहे.
प्रामुख्याने पिग आयर्न, स्क्रॅप कोळसा,स्टील, सिलिका सॅन्ड, फेरो सिलिकॉन, फेरी मँगेनीज,सह,आदी कच्चा माल लागतो.तो बहुतांश विदेशातून आयात होते; आयात शुल्क वाढला आहे,आयात होताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत,पोर्ट चार्जेस वाढले आहेत.
चार महिन्यांपासून मागणी कमी
कोल्हापूरच्या फाँड्री उद्योगाला हजार टन पिग आयर्न,२० हजार स्क्रॅप लागतो. पण गेल्या चार महिन्यांपासून प्रतिटन चार हजार ने मागणी कमी झाली असून सुद्धा दर वाढतच आहेत. सध्या पिश आयर्न सेसा गोवा आणि कर्नाटक होस्पेट येथून येते, तर कोळसा गुजरातमधून येतो.
स्कॅपचा पुणे, मुंबई, बंगलोरवरून पुरवठा होतो.सिलिका सॅन्ड फोंडा (कणकवली),कर्नाटकातून येते. जिल्ह्यात फाँड्रीत कास्टिंग तयार करण्यासाठी महिन्याला २० हजार टन पिग आयर्न, २० हजार टन स्क्रॅप, १५०० टन कोळसा, शंभरहून अधिक ट्रक सिलिका सँड लागते. तेव्हा महिन्याला ४० ते ५० हजार टन कास्टिंग तयार होते.
सँडमध्ये कोणतीही दरवाढ नाही
फौंड्री उद्योगाला सँड मोठ्या प्रमाणात लागते ती कोकण आणि कर्नाटक येथून येते सध्या अडीच ते तीन रुपये प्रति किलो दर आहे. कोणतीही दरवाढ झालेली नाही.
गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पिग आयर्न ५९ हजार रुपये झाले आहे.स्क्रॅप ४४ हजार,कोळसा ५२ हजार वर पोहचला आहे.या महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. -एम बी शेख-उद्योजक
कच्या मालाची होणारी सतत दरवाढ यामुळे फौंड्री उद्योग चालवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. अगोदर मंदी आली आहे.आणि त्यात दरवाढ त्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. - निरज झंवर, फौंड्री उद्योजक
फौंड्रीला सॅन्ड ही लागतेच सध्या सॅन्डचे दर वाढलेले नाहीत पण पेट्रोल डिझेल चे दर वाढल्याने मायनींगला ही जादा खर्च होतो त्यामुळे भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता आहे. -शेखर कुसाळे, उद्योजक