आशा कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:21+5:302021-02-05T07:15:21+5:30

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी जिल्हा परिषद सोसायटी सभागृहात संघटनेचे महासचिव सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ...

Asha employees issue ultimatum to state government | आशा कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

आशा कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

Next

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी जिल्हा परिषद सोसायटी सभागृहात संघटनेचे महासचिव सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्याला सुमारे तीनशेहून अधिक आशा उपस्थित होत्या.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेमध्ये यशस्वी करणाऱ्या आरोग्य दूत आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांच्या सेवा शास्वती तसेच आर्थिक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. कोरोना काळात या महिलांनी घर टू घर सर्व्हे करून काेरोनाविषयक जनजागृती आणि औषध उपचारांचे नियोजन केले. हे काम करतान आशांवर हल्ले झाले, अपमानास्पद वागणूक दिली गेली. कोरोनामुळे मृत झालेल्या आशा कर्मचाऱ्यांना शासनाकडून कोणतेही आर्थिक साहाय्य मिळाले नाही. जीव धोक्यात घालून काम करूनदेखील शासन दुर्लक्ष करत असल्याने त्या उद्विग्न झाल्या आहेत. या असंतोषाचे पडसाद रविवारच्या सभेमध्ये उमटले. आशांनी आक्रमकपणे लढ्यात उतरण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. यावेळी भरमा कांबळे, इंद्रजित पाटील, नेत्रदीपा पाटील, ज्योती तावरे, उज्ज्वला पाटील यांच्यासह आशा आणि गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट ०१

आशांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आशा कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धारही करण्यात आला.

Web Title: Asha employees issue ultimatum to state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.