दिवाळीला हातभारः कागलमधील 'आशां'ना मिळाले प्रोत्साहन अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:09 PM2020-11-14T17:09:49+5:302020-11-14T17:12:47+5:30
health, ashaworker, kolhapurnews आरोग्य विभागाचा मुख्य कणा बनलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी स्तरावरून दिवाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देवून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
दत्ता पाटील
म्हाकवे : आरोग्य विभागाचा मुख्य कणा बनलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी स्तरावरून दिवाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देवून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
दोन दिवसापूर्वी सभापती पुनम मगदूम-महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी सर्व ग्रामपंचायतीना लेखी आदेश देवून याबाबत आवाहन केले होते.त्याला ग्रामपंचायतीनीही उस्फुर्त प्रतिसाद देत प्रत्येकी दीड हजारापासून तीन हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देवू केले आहे.याबाबत आशांमधून समाधानाचे वातावरण आहे.
विशेष बाब म्हणजे आशांच्या योगदानाची दखल घेणारी राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. मानधन मिळेलच याची तमा न बाळगता जीव धोक्यात घालून कोरोना काळात आशांनी घरोघरी जाऊन दररोज सर्व्हे केला.त्यामुळे आरोग्य विभागाला मोलाची मदत झालीतालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी सणानिमित्त दिलेली हि भाऊबीजच असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.यासाठी सिटूचे जिल्हा सचिव काँ.शिवाजी मगदूम यांनीही पाठपुरावा केला.
"आपल्या जीवासह कुंटुंबाकडे दुर्लक्ष करत आशांनी योगदान दिले आहे.अडचणीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाला गावचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी सहकार्य केले.याबाबत कृतज्ञता राखत ग्रामपंचायतीनीही प्रोत्साहन अनुदान देत आम्हाला भाऊबीजच देवू केली आहे.यापुढेही गावावर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आशा पुढे राहतील.
उज्ज्वला पाटील
जिल्हासचिव, आशा संघटना
सिध्दनेर्ली'कडून सर्वाधिक तीन हजार
सभापती मगदूम यांचे मुळगाव असणाऱ्या सिध्दनेर्ली ग्रामपंचायतीने प्रत्येकी ३ हजार,बाळेगोळ २५००,म्हाकवे२हजार, बामणी यासह तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी उस्फूर्तपणे अनुदान दिले. याबाबत आशां संघटनेने सभापती,सर्व सदस्य,गटविकास अधिकारी यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.