संत सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १६ बग्ग्यांत आषाढी एकादशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:27+5:302021-07-22T04:15:27+5:30
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, कोकण, तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या बग्ग्यात (बकऱ्यांच्या कळपात)आषाढी ...
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, कोकण, तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या बग्ग्यात (बकऱ्यांच्या कळपात)आषाढी एकादशी धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली.
संत सद्गुरू बाळूमामांचे बकऱ्यांचे १६ बग्गे (कळप)असून, या बग्ग्यांमध्ये वालंग (ढोलवादन),बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन, भजन (हरिजागर), आदी कार्यक्रम झाले.
बुधवारी (दि.२१) द्वादशीला सकाळी आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. महाराष्ट्रात सोळा ठिकाणी कंसात जिल्हा आषाढी एकादशी, नरवटवाडी (नांदेड), बादलेवाडी, कमलापूर, कुपसिंगी (सोलापूर), कोळगाव (अहमदनगर), आडगाव (यवतमाळ), अब्दुललाट (कोल्हापूर), आळसंद, आरग (सांगली), डोंबाळवाडी (पुणे), चापोली (लातूर), नंदापूर (जालना), गुढे (जळगाव) या ठिकाणी बकऱ्यांमध्ये झाली.
यावेळी प्रत्येक बग्ग्याचे कारभारी बापू हातणुरकर,
गुंडोपंत पाटील, यशवंत सुरण्णवर, आप्पा माळी, विष्णू गायकवाड, अनिल शिणगारे, विशाल सिद्ध, लहू गायके, बाळू शिणगारे, सुबराव लवटे, काशिनाथ शिणगारे, पांडुरंग बंडगर, हालाप्पा सुराण्णवर, लकाप्पा दुरदुंडी, नागाप्पा मिरजे, राहुल वाघमोडे, तसेच प्रत्येक बग्ग्यात बकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे मेंढके, हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी १६ बग्ग्यांतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादानंतर प्रत्येक बग्ग्यांतून महाराष्ट्र, तसेच कर्नाटक, आदी राज्यातील भाविक रवाना झाले.
फोटो ओळी :
बादलेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आषाढी एकादशीची काही
छायाचित्रे :
वागर्यातील मेंढरे, भजन, कीर्तन कार्यक्रम