Teachers Day: उपेक्षितांच्या शिक्षणासाठी गुरु करतोय ‘भंगार’ गोळा !, कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक जाधव यांचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:45 PM2024-09-05T12:45:23+5:302024-09-05T12:47:35+5:30

आर्थिक पाठबळ मिळाल्यास उपेक्षितांचे शैक्षणिक जीवन उंचावेल

Ashok Jadhav a teacher from Yadrav in Kolhapur collects scraps for the education of the marginalized | Teachers Day: उपेक्षितांच्या शिक्षणासाठी गुरु करतोय ‘भंगार’ गोळा !, कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक जाधव यांचा अनोखा उपक्रम

Teachers Day: उपेक्षितांच्या शिक्षणासाठी गुरु करतोय ‘भंगार’ गोळा !, कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक जाधव यांचा अनोखा उपक्रम

घन:शाम कुंभार

यड्राव : घरच्या व सामाजिक अशिक्षितपणामुळे स्वत:ला शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अडचणी, त्यातून जिद्दीने शिक्षण घेवून झालेली प्रगती याचा उपयोग इतर उपेक्षित व गरीब मुलांना व्हावा. यासाठी झोपडपट्टी व गोरगरिबांच्या वसाहतीमध्ये जाऊन त्यांना व त्यांच्या पालकांना प्रबोधन, शैक्षणिक साहित्य मदत देऊन शिक्षण प्रवाहात आणणे, या उपक्रमास मदत करणाऱ्याकडून भंगार स्वरूपात साहित्य घेण्यासाठी बोलवल्यास तेथेच जाऊन तिचा स्वीकार करत हा अनोखा उपक्रम येथील शिक्षक अशोक जाधव हे  करीत आहेत. समाजातून आर्थिक पाठबळ मिळाल्यास या उपेक्षितांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमय होऊ शकते.

येथील यड्राव फाटा परिसरातील स्टारनगर येथे राहत असलेले अशोक जाधव हे एकही गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून इचलकरंजीसह कोल्हापूर ,सांगली ,सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या कचरा वेचणारी, बांधकाम कामगारांची, धुनी-भांडी करणाºयांची मुले तसेच आर्थिक परिस्थिती नसणाºया मुलांचा सर्व्हे करून त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेतात.

अशा गरजू मुलांसह पालकांचे याबाबत प्रबोधन करून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगून शैक्षणिक साहित्य, वह्या, दप्तरे व आवश्यकता गरजा पूर्ण करतात व त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याची धडपड अखंडित सुरू आहे. गरीबीमुळे मुलींना शिक्षण देण्यासाठी पालक तयार नसतात. मग त्यांना प्रबोधन झाल्याने स्वत:हून मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मचरित्रापासून प्रेरणा घेऊन बरीच मंडळी त्यांना या उपक्रमास आर्थिक सहकार्य करत आहेत. तर स्वत:च्या घरातील भंगार साहित्य त्यांना मोफत देऊन तर काही मंडळी अल्प किंमतीत भंगार साहित्य देवून या उपक्रमात सहभागी होत आहेत. समाजाकडून किंवा दानशूरांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास उपेक्षित मुलांचे शैक्षणिक भवितव्य प्रकाशमय होऊ शकते.

माझे बालपण झोपडपट्टीमध्ये गेले असल्याने मला याची झळ बसली आहे. मी चांगल्या संस्थेमध्ये शिक्षक आहे. माझी मुले वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. त्याप्रमाणे गरीब मुलांना शिक्षण मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठीच माझी धडपड सुरु आहे. या उपक्रमास दानशूर व्यक्ती फोन करून मला बोलावल्यास त्या ठिकाणी जाऊन त्यांची भंगार स्वरूपात मदत स्वीकारतो. - अशोक जाधव, भंगारकार, इचलकरंजी.

Web Title: Ashok Jadhav a teacher from Yadrav in Kolhapur collects scraps for the education of the marginalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.