अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ आत्मचरित्राला पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:57 PM2018-03-30T17:57:36+5:302018-03-30T17:57:36+5:30
इचलकरंजी येथील अशोक सखाराम जाधव यांनी लिहिलेल्या ‘भंगार’ या आत्मचरित्राला शुक्रवारी मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोल्हापूर : इचलकरंजी येथील अशोक सखाराम जाधव यांनी लिहिलेल्या ‘भंगार’ या आत्मचरित्राला शुक्रवारी मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
जाधव यांनी भंगार वेचत शिक्षण घेतले आहे आणि सध्या ते इचलकरंजी येथील शाळेमध्ये शिक्षक आहेत. मुंबई येथील सुप्रभात वृत्तसेवा या संस्थेमार्फत हा पुरस्कार मुंबईत १ मे रोजी कामगारदिनी प्रदान केला जाणार आहे. संस्थेचे मानद अध्यक्ष प्रमोद सदानंद यांनी ही माहिती दिली.
सुमारे १०३ आत्मचरित्रांतून ‘भंगार’ या आत्मचरित्राची निवड या पुरस्कारासाठी एकमताने करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.
जाधव यांना यापूर्वी डॉ. द. ता. भोसले सार्वजनिक वाचनालय, इसबावी व जिव्हाळा परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, रोख रक्कम पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसेच शाल-श्रीफळ मान्यवर साहित्यिक श्रीकांत देशमुख व उल्हासदादा पवार यांच्या हस्ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पंढरपूर येथे देण्यात आला आहे.