जयवंतराव विरूद्ध अशोकअण्णा फेस-टू-फेस लढत---लक्षवेधी लढत

By admin | Published: February 10, 2017 12:23 AM2017-02-10T00:23:08+5:302017-02-10T00:23:08+5:30

रंगतदार सामना : आजरा साखर कारखान्याच्या आजी-माजी अध्यक्षांचे एकमेकांना आव्हान-

Ashokanna face-to-face in the fight against Jayantrao- | जयवंतराव विरूद्ध अशोकअण्णा फेस-टू-फेस लढत---लक्षवेधी लढत

जयवंतराव विरूद्ध अशोकअण्णा फेस-टू-फेस लढत---लक्षवेधी लढत

Next


ज्योतीप्रसाद सावंत ---आजरा
आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी विरुद्ध माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्यात थेट लढत होत आहे. तालुक्यात ताराराणी आघाडीची शकले पडल्यानंतर चराटी यांची विजयाची परंपरा खंडित करण्यासाठी दोन्ही काँग्रेसने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
अशोकअण्णांना अंतर्गत विरोधकांचा असणारा विरोधही यावेळी उफाळून आला आहे. एकीकडे राजकीय अस्तित्वाची जयवंतराव शिंपी यांची असणारी लढाई, तर दुसरीकडे विरोधकांवर पुन्हा एकदा मात करण्यासाठी ‘चराटी’ यांनी चालवलेले प्रयत्न यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
अशोकअण्णा चराटी यांनी महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक, साखर कारखाना निवडणूक लढवून त्यामध्ये यशही मिळविले. जि. प. निवडणुकीत मात्र अनेकांनी ताराराणी आघाडीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना, श्रीपतराव देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, शामराव बोलके, अंकुश पाटील यांनी प्राधान्याने ‘ताराराणी’पासून संपर्क तोडला आहे. ‘स्वाभिमानी’ने कारखान्याप्रमाणेच उसना उमेदवार घेऊन त्याला स्वाभिमानीचा शिक्का मारला आहे. स्वाभिमानीची फरफट चालली आहे. ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी झाली आहे.
राष्ट्रवादीने पेरणोली पं. स. करिता उदय पवार यांना उमेदवारी देऊन जयवंतरावांना पेरणोली भागातून मतदान वाढेल अशी दक्षता घेतली आहे, तर ताराराणीने सहदेव नेवगे (गवसे) यांना उमेदवारी दिली आहे. देवर्डे येथील मतदारांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सद्य:स्थितीत दोन्ही प्रमुख आघाड्यांची हवा ‘ताईट’
आहे. खेडे, सोहाळे ही प्रमुख गावेही काय भूमिका घेणार? यावर मताधिक्क्यांची गणित अवलंबून राहणार आहेत.

कि फॅक्टर...
प्राधान्याने हा मतदारसंघ म्हणजे तालुक्याचा पश्चिम भाग आहे. या मतदारसंघातच आजरा शहराचा समावेश होतो. कारखाना निवडणुकीत महाआघाडीच्या विजयात या मतदारसंघाचा मोठा वाटा होता.
मुस्लिम मतदार हा घटकही येथील निवडणुकांवर परिणाम करणारा घटक आहे. दोन्ही बाजूने पंचायत समितीकरिता मुस्लिम उमेदवार दिला आहे.
शिवसेनेने या जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या पेरणोली पंचायत समिती गण व आजरा पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले असले तरी जिल्हा परिषदेकरिता उमेदवार न देता आपला ‘हातचा’ राखून ठेवला आहे.


जिल्हा परिषदेला शिवसेनेची रसद कोणाला मिळणार? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सभापती विष्णूपंत केसरकर यांनी अशोक चराटी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. त्यामुळे सेनेची भूमिका काय राहणार याचा अंदाज येत आहे.

Web Title: Ashokanna face-to-face in the fight against Jayantrao-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.