अशोकराव माने तंत्रनिकेतनचा तेजस दिवे विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:23 AM2021-09-13T04:23:55+5:302021-09-13T04:23:55+5:30
सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. ३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ४०८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य ...
सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.
३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ४०८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.६३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था अध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, प्राचार्य वाय. आर. गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाकाळातही ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम प्रभावीपणे राबविला. अभ्यासक्रमाबरोबरच तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, अद्ययावत ज्ञान देण्याचा प्रयत्न कॉलेजने केला. त्यामुळे निकाल चांगला लागला, अशी माहिती संस्था अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.
निकाल असा -
मेकॅनिकल- तेजस दिवे ९६.५०, प्रतीकराज काकडे ९५.९५, दीपक पाटील ९४.७७.
कॉम्प्युटर- नाझ अत्तार ९३.१४, प्रणोती देसाई ९१.८९, हर्षवर्धन मांगलेकर ९१.०९.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन- समर्थ पाटील ९७.७१, प्रत्यय पाटील ८९.५९, प्रज्ञा बददूर-८८.२९.
इलेक्ट्रिकल- श्रेयशी पाटील, निरंजन साळुंखे ८९.६३, कोमल माने ८७.१३. सिव्हिल-फरदिन जमादार ८८.७०, आदर्श बोंंगाळे ८९.८४, कुणाल मगदूम ८५.२५.
ऑटोमोबाइल- आदित्य भागवत ८८.७०, अनिरुद्ध पोतदार ८८.२२, कार्तिक हराळे ८६.२७.
प्रथम वर्ष -प्रणव सुतार ९३.९६, अभिषेक माळी ९१.९०, विश्वजित पाटील ९०.४३.