अश्विनीचे धड पेटीत, अवयव फ्रीजमध्ये : खुनाची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:53 AM2018-03-03T00:53:36+5:302018-03-03T00:53:36+5:30
कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकण्यात आले.
'
अश्विनी यांचा खून करून धड पेटीत आणि इतर अवयव फ्रीजमध्ये ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश पळणीकर यांना अनुक्रमे ५ आणि ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अश्विनी यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक केली होती. कुरुंदकर याला चालक भंडारीने मदत केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली होती. भार्इंदर येथून ज्या दिवशी अश्विनी बिद्र्रे बेपत्ता झाल्या, त्या दिवशी मध्यरात्री भंडारीच्या मोबाइलचे लोकेशनसुद्धा त्याच परिसरात असल्याचे आढळले होते. पुण्याहून रात्री उशिरा आल्याने भार्इंदर येथील बंटास हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचे त्याने सांगितले होते.
लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे
पळणीकरने घडलेला प्रकार कथन केल्याने अश्विनी यांचा खून झाल्याचे निष्पन झाले. कुरुंदकर यांनी अश्विनी यांचा त्यांच्या घरी खून केला व लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले. धड घरातील पेटीत एक दिवस ठेवले. डोके, हात, पाय तोडून ते काही काळ फ्रीजमध्ये ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, अवयव काही तासांत कुरुंदकर व त्याच्या चालकाने खाडीत फेकले.
अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे नेमके कुठे टाकले याची माहिती घेण्याकरिता नौदलाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी शुक्र वारी न्यायालयात दिली.
कुंदन भंडारीच्या पत्नीने हात जोडले
शुक्र वारी न्यायालयात आरोपी कुंदन भंडारीची पत्नी आली होती. पतीला पाहून तिला रडू आवरले नाही. न्यायालयाच्या दारात हात जोडून ती पतीकरिता प्रार्थना करीत होती.