कन्नूर यांच्या कलेतून स्त्री रूपाचे पैलू : हिर्डेकर - चित्रप्रदर्शनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:26 PM2019-11-21T12:26:53+5:302019-11-21T12:27:19+5:30
कर्नाटक सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मनोज दरेकर होते.
कोल्हापूर : देशभरातील कलाकारांचे कोल्हापूर कायमच आकर्षण राहिले आहे. चित्रकार मल्लिकार्जुन कन्नूर यांच्या कलेतून स्त्री रूपाचे अनेक पैलू पाहायला मिळतात, असे मत संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
कर्नाटक सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मनोज दरेकर होते.
दरेकर म्हणाले, कलेला जात, धर्म, पंथ, प्रांत नसतो. कन्नूर यांच्या चित्रामधून बुद्धाच्या वेगवेगळ्या छटा उमटल्या आहेत. कर्नाटक सरकारच्या स्तुत्य उपक्रमाचे महाराष्ट्र शासनानेही अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळेल.
महेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. यावेळी चित्रकार विजय टिपुगडे, माई हिर्डेकर, हर्षद कुलकर्णी, श्रीदेवी कन्नूर, सुभाष पाटील यांच्यासह विद्यार्थी व कलारसिक उपस्थित होते.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात बुधवारी आयोजित चित्रकार मल्लिकार्जुन कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीदेवी कन्नूर, प्रा. मनोज दरेकर, विजय टिपुगडे, सुभाष पाटील उपस्थित होते.