रस्ता डांबरीकरण करा, अन्यथा मनपा इमारतीत गाडवे सोडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:08+5:302021-07-23T04:15:08+5:30
कोल्हापूर : जुन्या आपटेनगर रिंगरोडचे डांबरीकरण व्हावे, यासाठी नागरिकांनी गेले वर्षभर आंदोलने केली, पण सुस्तावलेल्या प्रशानाला अद्याप जाग आलेली ...
कोल्हापूर : जुन्या आपटेनगर रिंगरोडचे डांबरीकरण व्हावे, यासाठी नागरिकांनी गेले वर्षभर आंदोलने केली, पण सुस्तावलेल्या प्रशानाला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी रिंगरोडवर पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. तातडीने रस्ते दुरुस्ती न केल्यास महापालिका इमारतीत गाडवे सोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
पावसाळा सुरू झाल्याने या रिंगरोडवरील खड्डे पाण्यानी भरले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने रिंगरोवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
संतप्त वैतागलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले. या वेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माजी नगरसेवक अमोल माने यांनी संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास महापालिका इमारतीत गाढव सोडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, मितालीताई पाटील, अमर सरनाईक, अक्षय चाबूक, समीर जगदाळे, अमित पाटील, जाफर सादिक, साधना देसाई, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो नं. २२०७२०२१-कोल-फुलेवाडी रिंगरोड
ओळी : जुना आपेटनगर रिंगरोडचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी पाण्याने भरलेल्या खड्ड्यातच वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
220721\22kol_1_22072021_5.jpg
ओळी : जुना आपेटनगर रिंगरोडचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी संतप्त नागरींकांनी गुरुवारी सकाळी पाण्याने भरलेल्या खड्ड्यातच वृक्षारोपण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवला.