शेतातील गवतावर औषध मारल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:28+5:302021-07-08T04:17:28+5:30

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विठ्ठल पाटील हे आपल्या फये येथील शेतात गेले असता आरोपी पांडुरंग बाळू पाटील ...

Assault on a person due to misunderstanding of drug application on field grass | शेतातील गवतावर औषध मारल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

शेतातील गवतावर औषध मारल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

Next

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विठ्ठल पाटील हे आपल्या फये येथील शेतात गेले असता आरोपी पांडुरंग बाळू पाटील व वैभव पांडुरंग पाटील (रा. फये, ता. भुदरगड) हे पितापुत्र तिथे आले व त्यांनी गवतावर तणनाशक औषध फवारणी का केली? असे म्हणून शिवीगाळ केली व पांडुरंग पाटील याने फिर्यादीच्या डोक्यात खुरपे मारत असताना विठ्ठल पाटील यांनी हात वर केल्यावर त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर खुरपे लागले. तर वैभव याने काठीने हातावर, पायावर मारहाण केली, त्यामध्ये फिर्यादी यांचे बोट मोडले आहे. याप्रकरणी पिता-पुत्र या दोघांविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.त्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Assault on a person due to misunderstanding of drug application on field grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.