एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:33 PM2024-06-14T12:33:09+5:302024-06-14T12:34:33+5:30

'लोकसभेतील त्रुटी दूर करून महायुती सर्वाधिक जागा जिंकेल'

Assembly will fight under the leadership of CM Eknath Shinde says Minister Chandrakant Patil | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : आगामी विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार असून, लोकसभेतील त्रुटी दूर करून महायुती सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निकालाबाबत भाजपच्या आढावा बैठकीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले दिवसभरात कोल्हापूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन त्यात दुरुस्ती करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.

पाटील म्हणाले, शरद पवार जरी आपलं सरकार आणणार असे म्हणत असले तरी कार्यकर्त्यांना उत्साह येण्यासाठी आम्ही सूर्य, चंद्र आणतो असं नेत्यांना सांगावं लागतं. ग्रामीण भाषेत जसं ‘पंप मारावा लागतो’ तसं पवार यांच चाललं आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या विधानसभेनंतर वेगळा मार्ग स्वीकारला. आता ते कट्टर हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. ३ नोव्हेंबरच्या आसपास नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील. ५ सप्टेंबरच्या जवळपास निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

Web Title: Assembly will fight under the leadership of CM Eknath Shinde says Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.