दसरा चौकात मिळकतींचे फेरसर्वेक्षण

By admin | Published: July 27, 2016 12:02 AM2016-07-27T00:02:13+5:302016-07-27T00:35:45+5:30

जी.आय.एस. कार्यप्रणालीचा वापर : कामाची उपायुक्तांकडून पाहणी

Assessment of Income Tax Assessment in Dasar Square | दसरा चौकात मिळकतींचे फेरसर्वेक्षण

दसरा चौकात मिळकतींचे फेरसर्वेक्षण

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने जीआयएस कार्यप्रणालीद्वारे सर्व मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. या कामाची उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी दसरा चौक येथील सीता कॉलनी येथे भेट देऊन मिळकतींच्या सर्वेक्षणाची पाहणी केली.
उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती घेऊन अधिक माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, सायबर टेक सिस्टीम अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लि.चे जनरल मॅनेजर जयंत पंत, प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत सिंग, कर्मचारी उपस्थित होते.
हे फेरसर्वेक्षण महाराष्ट्र महानगरपालिका तरतुदीनुसार करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे काम सायबर टेक सिस्टीम अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लि. या संस्थेमार्फत सोमवारपासून सुरू झाले आहे. सर्वेक्षणात शहरातील मालमत्ताधारक व भोगवटाधारक, कुळ यांच्या नावांची, पत्त्यांची अशा विविध ८० मुद्द्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Assessment of Income Tax Assessment in Dasar Square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.