CoronaVirus Lockdown : जयसिंगपूरच्या हॉस्पिटलकडून शिरोळच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:58 AM2020-05-09T11:58:09+5:302020-05-09T11:58:51+5:30
जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली.
कोल्हापूर : जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली.
यामध्ये 1 हजार अंघोळीचे साबण, 1 हजार कपडे धुण्याचे साबण, 1 हजार टुथपेस्ट, 1 हजार टुथब्रश आणि 2 हजार मास्कचा समावेश आहे.
इंडोकाऊंट फौंडेशनकडून हातकणंगले सेंटरसाठी मदत
हातकणंगले तालुक्यामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी इंडोकाऊंट फौंडेशनकडून 1 हजार 500 बेडशीट, 1 हजार 500 पिलो कवर, 5 हजार मास्क तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून 2 हजार सॅनिटायझरच्या बाटल्या, 1 हजार अंघोळीचे साबण, 1 हजार 500 कपडे धुण्याचे साबण आणि 1 हजार 500 टुथब्रश तहसिलदार प्रदिप उबाळे यांच्याकडे आज सुपूर्द केल्या.