युनियन बँक ऑफ इंडियाच्यावतीने मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:31+5:302021-07-10T04:17:31+5:30

सातवे येथील तरुण सुनील वय ३० याची दीड महिन्यापूर्वी झालेल्या लग्नाची हळद सुकन्या आधीच ६ डिसेंबर रोजी मोटर सायकल ...

Assistance from Union Bank of India | युनियन बँक ऑफ इंडियाच्यावतीने मदत

युनियन बँक ऑफ इंडियाच्यावतीने मदत

Next

सातवे येथील तरुण सुनील वय ३० याची दीड महिन्यापूर्वी झालेल्या लग्नाची हळद सुकन्या आधीच ६ डिसेंबर रोजी मोटर सायकल स्लीप होऊन अपघाती मृत्यू झाल्याने सातवेसह परिसरात हळहळ व्यक्त झाली होती .वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झालेले दोन बहिणी व आई असा परिवारात वंशाचा एकुलता एक कुलदीपक अपघातात गेल्याने पूर्ण कुटूंबच हादरले होते.

सुनीलचा कोणताही विमा नव्हता परंतु युनियन बँकेच्या खात्याचे एटीएम कार्ड होते. या बँकेच्या शाखाधिकारी वैशाली दाते, उपशाखाधिकारी सुनीता येडावी यांनी एटीएम कार्डच्या असलेल्या अपघाती विमा योजनेतून सुनील यांची आई सुमन रघुनाथ पाटील यांचेकडे दोन लाख रु.ची विमा रक्कम सपूर्द केली. यावेळी माजी उपसरपंच माणिक पाटील बँकेचे कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

अपघातानतंर कुटुंबाची होणारी परवड थांबवण्यासाठी सर्वांनी बँकेच्या माध्यमातून असणाऱ्या विमा योजनेतील विमा पॉलिसी उतरवावी, असे आवाहन शाखाधिकारी वैशाली दाते यांनी यावेळी केले.

फोटो ओळ : सातवे (ता. पन्हाळा) येथील अपघात झालेल्या वारसाच्या कुटुंबीयांना विम्याचा धनादेश सुपूर्त करताना शाखाधिकारी वैशाली दाते व इतर छाया संजय पाटील.

Web Title: Assistance from Union Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.