कोरोना रुग्णांच्या नाष्ट्यासाठी थेट अमेरिकेतून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:03+5:302021-07-03T04:17:03+5:30
जहांगीर शेख कागल : येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना दररोज सकाळी पौष्टिक आहार देण्याचा उपक्रम सेवाभावी ...
जहांगीर शेख
कागल : येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना दररोज सकाळी पौष्टिक आहार देण्याचा उपक्रम सेवाभावी वृत्तीने काही युवकांनी राबविला आहे. गेल्या चाळीस दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाची दखल अमेरिकेत असलेल्या कागलच्या दोघांनी घेत त्याला मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेत संशोधक म्हणून कार्यरत असलेले डाॅ. नवला शेंबडे यांनी पंचवीस हजार रुपये तर शंतनू शिंदे यांनी पाच हजार रुपये पाठवून या युवकांचा उत्साह वाढविला आहे.
येथील परिवार सेवाभावी संस्था, आपुलकी सेवाभावी संस्था आणि मानवता फाउंडेशन यासह इतरांनी कागल कोविड संयुक्त सेवाभावी संस्था तयार करून कोरोना रुग्णांना रोज सकाळी दोन अंडी, दोन केळी, एनर्जी ड्रिंक देणे सुरू केले. स्वतःजवळचे आणि लोकांनी केलेल्या मदतीतून गेली चाळीस दिवस हे वाटप सुरू आहे. रोज सरासरी दोनशेच्या आसपास रुग्ण असतात. हा रोजचा खर्च चार हजारच्या दरम्यान आहे. कागल कोविड सेंटरमध्ये शेवटचा रुग्ण असेपर्यंत हा उपक्रम राबविणार आहेत. गेल्या चार दिवसांत मदतीअभावी अडचण झाली होती. मात्र अमेरिकेतून नवला शेंबडे आणि शंतनू शिंदेनी मदत पाठवुून उपक्रम खंडित होऊ दिला नाही. इतरांनीही मदत करावी, असे आवाहन अझर ताहशीलदार व अरविंद व्हटकर यांनी केले आहे.
चौकट
● या युवकांचा पुढाकार..
तुषार भास्कर, प्रशांत दळवी, हिदायत नायकवडी, अरविंद व्हटकर, सुरज कांबळे, अझर ताहशीलदार, शिवराम भोई व इतर सदस्य रोज सकाळी हे साहित्य घेऊन कोविड सेंटरमध्ये हजर असतात.
०२ कागल कोविड सेंटर हेल्प
फोटो कॅपशन
कागल कोविड सेंटरमध्ये गेली चाळीस दिवस कागलधील हे सेवाभावी युवक कोरोना रुग्णांना केळी, अंडी वाटप करीत आहेत.