कोल्हापूर: बिलाच्या कामाची फाईलसाठी मागितले तीन हजार रुपये, लाचखोर सहाय्यक लेखाधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 04:06 PM2022-10-06T16:06:27+5:302022-10-06T16:06:52+5:30

या कारवाईमुळे पन्हाळा पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.

Assistant Accountant of Panhala Panchayat Samiti arrested for accepting bribe | कोल्हापूर: बिलाच्या कामाची फाईलसाठी मागितले तीन हजार रुपये, लाचखोर सहाय्यक लेखाधिकारी अटकेत

कोल्हापूर: बिलाच्या कामाची फाईलसाठी मागितले तीन हजार रुपये, लाचखोर सहाय्यक लेखाधिकारी अटकेत

Next

कोल्हापूर : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल तपासून पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. अरुण रघुनाथ मांगलेकर (वय ५५, रा. प्लॉट नं. ६ व ७, मनोरमानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पन्हाळा पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.

तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील रस्त्याचे तीन लाखाचे काम केले आहे. तसेच मौजे आरळे येथील आरसीसी गटरीचे काम केले आहे. या दोन्ही कामाच्या बिलाची फाईल व रक्कम मिळवण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. या कामासाठी सहाय्यक लेखा अधिकारी मांगलेकर याने विना त्रुटी दोन्ही फाईल कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी तीन हजार रुपये यांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज दुपारी पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयात मांगलेकर याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनील घोसाळकर, पोकॉ रुपेश माने, मयूर देसाई, हेकॉ विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

Web Title: Assistant Accountant of Panhala Panchayat Samiti arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.