खगोलप्रेमींनी अनुभवला सुपरमून, छायाकल्प चंद्रग्रहणाची सोळा मिनिटांची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:25+5:302021-05-27T04:26:25+5:30

कोल्हापूर : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण जगभरात आज, बुधवारी दिसले, पण कोल्हापूरकरांनी मात्र, हे चंद्रग्रहण पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प ...

Astronomers experience a supermoon, a sixteen-minute lunar eclipse | खगोलप्रेमींनी अनुभवला सुपरमून, छायाकल्प चंद्रग्रहणाची सोळा मिनिटांची प्रचिती

खगोलप्रेमींनी अनुभवला सुपरमून, छायाकल्प चंद्रग्रहणाची सोळा मिनिटांची प्रचिती

Next

कोल्हापूर : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण जगभरात आज, बुधवारी दिसले, पण कोल्हापूरकरांनी मात्र, हे चंद्रग्रहण पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण स्वरूपात अनुभवले. मोठा आणि अधिक तेजस्वी असलेला या वर्षाखेरीचा अखेरचा सुपरमून होता. कोल्हापूरकरांना हा चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल सोळा मिनिटे अनुभवता आला. यावेळेला पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडला होता.

चंद्रग्रहणास आज, बुधवारी दि. २६ मेच्या रात्री ७ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात झाली आणि रात्री ७ वाजून १९ मिनिटापर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण दिसले. छायाकल्प चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रबिंबाची तेजस्विता उणे ०. ७१२ एवढी होती. हे चंद्रदर्शन म्हणजे या वर्षातील अखेरचा सुपरमून होता. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटरवर आहे. आज, तो ३ लाख ५७ हजार किलोमीटरवर होता, त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसला.

कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी अनुभवली पर्वणी

कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी ही पर्वणी साधली. कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशनचे आनंद आगळगावकर, सागर बकरे, उत्तम खारकांडे, राजेंद्र भस्मे, शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर, सनी गुरव, विवेकानंद महाविद्यालयाचे पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामीण भागातून सोळांकूर येथील सायन्स कॉलेजचे प्राध्यापक अविराज जत्राटकर, किरण गवळी आदींसह अनेक खगोलप्रेमींनी आपापल्या ठिकाणाहून हा खगोलक्षण अनुभवला.

तेजस्वी चंद्रामुळे उघड्या डोळ्यांनी पाहिले ग्रहण

चंद्रग्रहण हे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत आल्यावर होत असते. ज्यामध्ये पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण आपणास दिसू लागते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. तसेच छायाकल्प ग्रहणात पृथ्वीची पडछाया चंद्रावर पडल्यामुळे चंद्र पूर्णतः झाकला गेला नाही. तो पृथ्वीच्या उपछायेतून मार्गस्थ झाल्याने या चंद्रग्रहणाच्यावेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला होता. पौर्णिमेच्या चंद्राची ग्रहकालावधीत तेजस्विता उणे ०. ७१२ असल्यामुळे हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता आले.

------------------------------------------------------------------------------------------------------------

फोटो : 26052021-Kol-Supermoon Photo.jpg

फोटो ओळ : कोल्हापूरकरांनी बुधवारी रात्री पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प स्वरूपात चंद्रग्रहण अनुभवले. मोठा आणि अधिक तेजस्वी असलेला या वर्षाखेरीचा अखेरचा सुपरमून होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

(बातमीदार : संदीप आडनाईक)

===Photopath===

260521\26kol_7_26052021_5.jpg

===Caption===

फोटो : 26052021-Kol-Supermoon Photo.jpgफोटो ओळ : कोल्हापुरकरांनी बुधवारी रात्री पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प स्वरुपात चंद्रग्रहण अनुभवले. मोठा आणि अधिक तेजस्वी असलेल्या या वर्षअखेरीचा अखेरचा सुपरमून होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Astronomers experience a supermoon, a sixteen-minute lunar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.