खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:45 AM2022-04-01T11:45:20+5:302022-04-01T11:45:56+5:30

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे.

At the time of Gudipadva, the price of gold dropped by one and a half thousand | खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला

खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला

Next

कोल्हापूर : रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे सातत्याने वाढत असलेल्या सोन्याचा दर गेल्या चार दिवसांत दीड हजाराने कमी झाला आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे. सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ५३ हजार ५०० वरून ५२ हजारांवर आला आहे. सणानिमित्त शनिवारी सराफ बाजार सुरू राहणार आहे.

रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे गेले दोन महिने सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत होते. सोन्याचा दर १० ग्रॅमला ५३ हजार ५०० पर्यंत वाढला होता; पण गेल्या चार दिवसांत हा वाढलेला दर कमी होत बुधवारी ५१ हजार ५०० वर आला. पण, गुरुवारी पुन्हा त्यात ५०० रुपयांची वाढ झाली. तरीदेखील हा दर मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना सणाच्या मुहूर्तावर उतरलेल्या दराने सोन्याची खरेदी करता येणार आहे.

एरवी शनिवारी सराफ बाजार बंद असतो, पण गुढीपाडव्याला आवर्जून सोने-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली जाते. तसेच कोरोनामुळे गेले दोन वर्षे विविध कारणाने बाजार बंद राहिला. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचे तर नुकसान झालेच शिवाय ग्राहकांनाही आपल्या पसंतीनुसार दागिने खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. पण, आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने शनिवारीदेखील सराफ बाजार सुरू राहणार आहे.

Web Title: At the time of Gudipadva, the price of gold dropped by one and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.