Atal Bihari Vajpayee : मराठा आंदोलकांची वाजपेयींना आदरांजली : बेमुदत ठिय्या आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:05 PM2018-08-18T12:05:22+5:302018-08-18T12:07:32+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली.
आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू ठेवत माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या निधनाबद्दल आंदोलकांनी शोक प्रकट केला. यावेळी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कोणतेही भाषण व घोषणाबाजी न करता हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले.
यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, किशोर घाटगे, अवधूत पाटील, विकी जाधव, किशोर घाटगे, शिवाजीराव हिलगे, नगरसेवक अर्जुन माने, विजयसिंह पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, कृष्णात हारूगडे, आदी उपस्थित होते.