‘अटल चषक’तर्फे ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा सत्कार-स्पर्धा महाराष्टबाहेरही पोहोचेल : ५0 खेळाडूंचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:16 AM2018-03-27T01:16:29+5:302018-03-27T01:16:29+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. कोल्हापूरची ही ‘अटल चषक स्पर्धा’ महाराष्टÑाबाहेरही पोहोचेल, अशी अपेक्षा यावेळी अनेक नेत्यांनी व सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, फुटबॉल हा कोल्हापूरच्या आत्मियतेचा खेळ आहे. पेठा-पेठांतील खेळाडूत उत्साह ओसंडून वाहत असतो, त्यातून काही वेळा गालबोट लागते; पण ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची किमया ज्येष्ठ खेळाडूंत असल्याने त्यांचा गौरव करणे उचित आहे. या फुटबॉल स्पर्धेतून फुटबॉल खेळाडूंसाठी स्वतंत्र निधी उभारून त्यांना खेळावेळी इजा झाल्यास या निधीचा उपयोग होईल, असाही विश्वास व्यक्त केला.
ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू आप्पासाहेब वणिरे यांनीही पूर्वीचा आाणि आजचा फुटबॉल स्पर्धा, त्यातील बक्षिसांची संख्या याची तुलना केली; पण कोल्हापुरात फुटबॉल खेळाचा म्हणावा तितका विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली, राज्य शासनाने खेळाडूंसाठी नोकरीत ५ टक्के आरक्षण ठेवावे, अशी मागणी केली.
शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी, ही ‘अटल स्पर्धा’ कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राला बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुमारे ५ लाखांचे बक्षीस देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी सूत्रसंचालन अशोक देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आप्पासाहेब वणिरे, गजानन इंगवले, बाबासाहेब इंगवले, चंद्रकांत साळोखे, भाऊ सुतार, आनंदा इंगवले यांच्यासह एकूण ५० ज्येष्ठ खेळाडूंचा जाहीर सत्कार झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, माजी आमदार सुरेश साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर स्पोर्र्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्यावतीने कोल्हापुरातील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब वणिरे यांचा शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी सुरेश जरग, अजित राऊत, संदीप देसाई, राजू साळोखे, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.