कलाकारांच्या मदतीसाठी ‘अथ २०२१’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:10+5:302021-08-26T04:26:10+5:30

कोल्हापूर : महापूर आणि कोरोनाच्या आपत्तीनंतर आता जनजीवन सुरळित झाले असले, तरी कलाविश्वाचा लॉकडाऊन संपलेला नाही. या परिस्थितीतून ...

'Ath 2021' exhibition to help artists | कलाकारांच्या मदतीसाठी ‘अथ २०२१’ प्रदर्शन

कलाकारांच्या मदतीसाठी ‘अथ २०२१’ प्रदर्शन

Next

कोल्हापूर : महापूर आणि कोरोनाच्या आपत्तीनंतर आता जनजीवन सुरळित झाले असले, तरी कलाविश्वाचा लॉकडाऊन संपलेला नाही. या परिस्थितीतून कलाकारांना बाहेर काढण्यासाठी ‘अथ २०२१’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 'आर्ट फॉर ह्युमॅनिटी परिवारच्यावतीने फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर गणपती बाप्पांच्या आगमनादिवशी म्हणजेच १० सप्टेंबरपासून हे प्रदर्शन सुरू होत आहे.

कलेला चालना मिळावी, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, नैराश्य दूर होऊन नवचैतन्य यावे, सकारात्मक ऊर्जा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. यात गणपती चित्र, शिल्प, मुद्राचित्र, मांडणी शिल्प, रेखाटने, सिरॅमिक आर्ट, मेटल क्राफ्ट, इलेस्ट्रेशन, सुलेखन असे कलाप्रकार असणार आहेत. या प्रदर्शनासाठी ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव, जी. एस. माजगावकर, विपता कपाडीया, अच्युत पालव, प्रकाश बाळ जोशी, शिल्पकार विशाल शिंदे, भगवान रामपुरे, चित्रकार प्रतिभा वाघ या निमंत्रित कलाकारांसोबतच अशोक हिंगे, काशीजी सुतार, भीवा पुणेकर, विजयराज बोधनकर, विजय टिपुगडे, विजय जैन यांचा सहभाग असणार आहे.

‘दहा दिवस, दहा गणपती'

या प्रदर्शनासोबतच ‘दहा दिवस, दहा गणपती’ ही नावीन्यपूर्ण स्पर्धा होणार असून, यात कलाकाराने रोज एक नाविन्यपूर्ण व सृजनात्मक गणपती तयार करायचा आहे. वैविध्यपूर्ण साधने वापरून गणेशाची विविध मनोहर रूपांची निर्मिती करायची आहे. हे करतानाचा एक व्हिडिओ रोज फेसबुक पेजवर अपलोड करायचा आहे. या दोन्ही उपक्रमांतील कलाकृतींमधून उत्कृष्ट कलानिर्मिती करणाऱ्या कलावंतांना 'सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि आर्ट मटेरियल' पुरस्कार स्वरूपात देऊन गौरविण्यात येणार आहे.

--

फोटो नं २५०८२०२१-कोल-एक्झीबीशन

--

Web Title: 'Ath 2021' exhibition to help artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.