अथणी शुगर्स लिमिटेड, भुदरगड युनिटचा गळीत हंगाम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:32+5:302021-04-05T04:22:32+5:30
अथणी शुगर्स लिमिटेड, भुदरगड युनिटने ७ मार्च २०२१ पर्यंत गाळपास आलेल्या सर्व उसाची बिले २८००/- प्रमाणे संबंधित बँकेत जमा ...
अथणी शुगर्स लिमिटेड, भुदरगड युनिटने ७ मार्च २०२१ पर्यंत गाळपास आलेल्या सर्व उसाची बिले २८००/- प्रमाणे संबंधित बँकेत जमा केले आहेत. त्याचबरोबर तोडणी व वाहतुकीचीदेखील सर्व बिले बँकेत जमा करून शेतकऱ्यांचा आणि वाहनमालकांचा विश्वास संपादन केला आहे. चालू हंगामात १३० दिवसांत कारखान्याने तीन लाख ७३ हजार ९०१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून १२.१२ टक्के रिकव्हरीने चार लाख ५४ हजार १६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, अशी माहिती कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
पुढील हंगामासाठी वाहनधारकानी लवकरात लवकर करार करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले, शेतकरी वर्गानेही चालू वर्षीसारखेच आपले सहकार्य कारखान्यास पुढेही चालू ठेवावे. कारखान्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी त्यांच्यासोबत चीफ इंजिनिअर नामदेव भोसले, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई, चीफ केमिस्ट पी. व्ही. खटावकर, मुख्य शेती अधिकारी एल. बी. देसाई, लेबर ऑफिसर कन्हैया गोरे, अकाैंटंट जमीर मकानदार, शशिकांत थोरवत, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, सुनील घुगरे, जगदीश घोरपडे, प्रमोद पाटील, दिलीप गायकवाड, इकबाल गड्डीकर, संताजी देसाई व कारखान्यातील सर्व खातेप्रमुख , शेतकरी, कामगार उपस्थित होते.