‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:23+5:302020-12-27T04:18:23+5:30

अथ ‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण ‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण चंदगड/प्रतिनिधी : ...

Atharva-Daulat completes two lakh tonnes of sugarcane crushing | ‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण

‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Next

अथ

‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण

‘अथर्व-दौलत’मध्ये दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण

चंदगड/प्रतिनिधी : हलकर्णी, ता. चंदगड येथील दौलत कारखाना हा चंदगडच्या शेतकऱ्यांची खुरीखुरी दौलत आहे . शेतकरी विश्वास ठेवून कारखान्याला ऊस पुरवठा करत आहेत. शेतकरी, कामगार यांच्या सहकार्याने आजअखेर ‘दौलत-अथर्व’ने दोन लाख मे. टन उसाचे गाळप केल्याची माहिती ‘अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. बंद पडलेला दौलत कारखाना अथर्व कंपनीने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, हितचिंतक यांच्या विश्वासावर गेल्यावर्षी सुरू केला. शेतकऱ्यांनीही ‘दौलत’प्रमाणेच अथर्व कंपनीला सहकार्य केले. त्यांच्या विश्वासास पात्र राहून गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गाळप झालेल्या उसाची वेळेत बिले अदा केली आहे. ६ लाख मे.टनाचे उसाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. कारखान्यामध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये २ लाख मे.टन ऊस गाळपाचा टप्पा पार झाला असून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तसेच चंदगड तालुक्यातील उसाचे १.७५ लाख मे.टन गाळप केले आहे. हत्तीबाधित हेरा, चंदगड, कानूर व घाटरकवाडी, गवसे आजरा गटामधील गावांतील क्षेत्रामध्ये बीड व स्थानिक अशा एकूण १०० टोळया कार्यरत असून, प्रत्येक गावामध्ये अग्रक्रमाने तोडणी सुरू आहे. यावर्षी उत्पादित झालेले कंपोष्ट खत रु. ६००अधिक जीएसटीसह विक्री करण्याचे धोरण ठरले आहे. त्याप्रमाणे कारखाना साईटवरून वितरित होत आहे. तसेच कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करूनच कारखाना बंद करणार असल्याचे अथर्व इंटरट्रेडचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले.

Web Title: Atharva-Daulat completes two lakh tonnes of sugarcane crushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.