‘अथर्व इंटरट्रेड’ सकारात्मक तोडगा काढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:40+5:302021-08-17T04:30:40+5:30

चंदगड : दौलत कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांच्या येणे रकमांबाबत जिल्हा बँक व अथर्व इंटरट्रेड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जे. ...

‘Atharva Intertrade’ will lead to a positive settlement | ‘अथर्व इंटरट्रेड’ सकारात्मक तोडगा काढेल

‘अथर्व इंटरट्रेड’ सकारात्मक तोडगा काढेल

Next

चंदगड : दौलत कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांच्या येणे रकमांबाबत जिल्हा बँक व अथर्व इंटरट्रेड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जे. जी. पाटील व गोविंद गावडे यांनी दिली.

हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरात आयोजित दौलत सेवानिवृत्त कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे म्हणाले, ‘दौलत’कडून कामगारांचे वेतन, बोनस, ग्रॅच्युईटी अशी देणी देय आहेत. कारखाना अथर्व व्यवस्थापनाकडे सोपवताना जिल्हा बँकेने त्यांना सेवानिवृत्त कामगारांच्या देण्यांबाबत कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांच्या शिष्टमंडळाने अथर्व व्यवस्थापन व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडे देय देण्यांबाबत व्यथा मांडल्या.

यावेळी अथर्व व्यवस्थापनाने याबाबत विचार करू, असे सांगून कामगारांच्या देण्यांबाबत आपली पुढील दिशा स्पष्ट केली. जानबा बोकडे, शामराव अडकूरकर, पी. बी. गायकवाड, डी. एस. पताडे, वसंत गणाचारी, एस. एस. सुतार, एस. आर. पाटील, अरुण होंगल, के. एन. पाटील आदींसह ३००हून अधिक कामगार यावेळी उपस्थित होते.

सूतगिरणीची शेअर्स रक्कम परत मागणार

कै. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी चंदगड तालुक्यात सूतगिरणी व्हावी यासाठी शेतकरी व दौलत कामगार यांच्याकडून शेअर्स रक्कम घेतली होती. मात्र, माजी आमदार पाटील यांच्या निधनानंतर याबाबत काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे त्याबाबत येत्या काही दिवसात पुढाकार घेतला नाही तर ती शेअर्सची रक्कमही परत देण्याची विनंती अनेक कामगारांनी केली.

Web Title: ‘Atharva Intertrade’ will lead to a positive settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.