आजरा येथे वकरांगी कंपनीकडून ‘एटीएम’ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:49+5:302021-09-05T04:28:49+5:30
पेट्रोल पंपावर दररोज वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात याठिकाणी ...
पेट्रोल पंपावर दररोज वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात याठिकाणी नागरिक येतात. प्रवास करीत असतात. या प्रवाशांना आजरा शहरात रक्कम मिळण्याची अडचण होऊ नये यासाठी वकरांगी कंपनीने हे एटीएम सुरू केले आहे.
याप्रसंगी आजरा बँक संचालक विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोस्कर, रमेश कुरुणकर, जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक कृष्णा येसणे, दिनेश कुरुणकर, आजरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, मिलिंद पुजारी, संजय सावंत, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, साखर कारखाना संचालक दशरथ अमृते, अनिकेत चराटी, दिलावर चाॅंद, मोहम्मद दरवाजकर, रामा शिंदे, सुलेमान नसरदी, मोहसीन मुल्ला, समीर चाॅंद, पंप व्यवसथापक निसार आगलावे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आजरा डिझेल व पेट्रोल पंपावर वकरांगी कंपनीचे एटीएम उद्घाटनप्रसंगी सुरेश डांग, अशोक चराटी आदींसह मान्यवर उपसिथत होते.
क्रमांक : ०४०९२०२१-गड-०७