हळदीत तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:18+5:302021-02-27T04:32:18+5:30

सडोली (खालसा) : हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

An atmosphere of tension in turmeric | हळदीत तणावाचे वातावरण

हळदीत तणावाचे वातावरण

Next

सडोली (खालसा) : हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित दोषींवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष्य लागून राहिले आहे. करवीर तालुक्यात गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी पार पडल्या.

हळदी येथील ग्रामपंचायतीची सत्ता काठावर असल्याने या ठिकाणी दोन्ही गटांकडून सरपंच व उपसरपंच पदांसाठी एक-एक असे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सत्ता काठावर असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रक्रियेत बारकाईने लक्ष्य घालून मतदान प्रक्रिया पार पाडायला हवी होती; परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रिका ११ उमेदवार असताना १३ मतपत्रिका तयार केल्या, या कुणाच्या फायद्यासाठी व उपसरपंच पदाच्या दोन मतपत्रिका गायब केल्या कुणी? हे करीत असताना यामधील मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढणे गरजेचे आहे. सदस्य ११ असताना मतपत्रिका १३ तयार करून मतदान प्रक्रिया घेण्याचे धाडस केलेच कसे, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: An atmosphere of tension in turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.