पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला शिक्षा, कणेरीवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:29 PM2019-07-08T17:29:47+5:302019-07-08T17:31:27+5:30
घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी पांडूरंग मारुती पाटील (वय ४२, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सरकारी वकील अॅड. अमिता कुलकर्णी यांनी या खटल्याचे काम पाहिले.
कोल्हापूर : घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी पांडूरंग मारुती पाटील (वय ४२, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सरकारी वकील अॅड. अमिता कुलकर्णी यांनी या खटल्याचे काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, कणेरीवाडी येथील आरोपी पांडुरंग पाटील याने २०१३ मध्ये पिडीत मुलगी घरासमोर अंगणात खेळत असताना तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात त्याचेवर गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पिसाळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. पिडीत मुलगी, डॉक्टर,पिडीतेचे पालक यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य माणून न्यायाधिश पाटील यांनी कलम ३७५ ,३५४ व बाललैगिक अत्याचार कलमानुसार आरोपी पांडुरंग पाटील यास शिक्षा सुनावली. पोलीस कॉन्स्टेबल वर्षा पाटील, वनिता चव्हाण यांनी खटल्याचे कामकाज सुरू असताना महत्वपूर्ण मदत केली.