किणीत विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:39+5:302021-04-21T04:25:39+5:30

याप्रकरणी योगेश नेमीनाथ चौगुले (वय ३३) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. ...

Atrocities on married women | किणीत विवाहितेवर अत्याचार

किणीत विवाहितेवर अत्याचार

Next

याप्रकरणी योगेश नेमीनाथ चौगुले (वय ३३) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजाणे करत आहेत. हा प्रकार जून २०२० ते १८ एप्रिलपर्यंतच्या काळात घडला. याची रात्री नोंद करण्यात आली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, किणी येथील चौगुलेने सौंदर्यप्रसाधने विक्री करण्यासाठी घरबसल्या काम करण्याची हमी देऊन विवाहितेचा विश्वास संपादन केला. शाळेपासून आवडेस असे बोलून पतीस घटस्फोट दे, दोघे विवाह करू, असे आमिष दाखविले. संपर्कातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार त्या महिलेने घरी सांगितल्यानंतर योगेशने पीडित महिलेच्या माहेर व सासरच्या घरांवर दगडफेक केली.

Web Title: Atrocities on married women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.