वाठारच्या वारांगणेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 06:32 PM2017-06-13T18:32:21+5:302017-06-13T18:32:21+5:30

कोल्हापूरात पंचगंगा नदीघाटावरील घटना, गुन्हा मात्र मारहाणीचा

Atrocities on the premises of the vessel | वाठारच्या वारांगणेवर अत्याचार

वाठारच्या वारांगणेवर अत्याचार

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीतील निर्जन स्थळी अंदाजे ३५ वर्षांच्या वारांगणेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही वाठार (ता. हातकणंगले) येथील राहणारी असून, सोमवारी (दि. १२) मध्यरात्री बाराच्या सुमारास चौघाजणांनी तिचे रेल्वे स्टेशनसमोरून रिक्षातून अपहरण करून लैंगिक अत्याचार केला.

संबंधित मुल्ला नावाचा रिक्षाचालक हा कनाननगर येथील असून, तो रोज रात्रीच्या वेळी शहरात फिरत असतो. तो बाहेरून कोल्हापुरात वेश्या व्यवसायासाठी येणाऱ्या वारांगणेवर दादागिरी करून हप्ता वसुली करीत असतो. त्याच्यावर शाहूपुरी पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. शहरात स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, विल्सन पूल, व्हीनस कॉर्नर, आदी परिसरांत रात्रीच्या दरम्यान वारांगणा फिरत असल्याने आंबटशौकिनांची गर्दी असते.

मिरज, वाठार येथील वारांगणा व्यवसाय करण्यासाठी नियमितपणे कोल्हापुरात येत असतात. वाठार येथील संबंधित पीडित महिला रेल्वे स्टेशनसमोरील बसस्टॉपमध्ये उभी असताना कनाननगर येथील रिक्षाचालक तिच्याजवळ आला. त्याने धंद्याचे पैसे देण्यासाठी हट्ट धरला. त्यातून दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी रिक्षाचालकाने तिला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले. तेथून दोघा-तिघा साथीदारांना घेऊन तो थेट शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीतील निर्जन स्थळी आला. या ठिकाणी तिच्यावर या चौघांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर हे सर्वजण निघून गेल्यानंतर त्या महिलेने शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले.

सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांची भेट घेऊन तिने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली. त्यावर पोलिसांनी मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. अत्याचार शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीत निर्जनस्थळी झाल्याने तिला करवीर पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पीडित महिलेसोबत आणखी आठ ते दहा महिलांनी मंगळवारी करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांची भेट घेऊन ‘त्या’ रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काही वेळाने या महिलांनी तडजोडीवर हे प्रकरण मिटविले. पीडित महिला तक्रार देण्यास पुढे न आल्याने गुन्हाच दाखल झाला नाही. दोन वर्षांपूर्वी शिवाजी पुलानजीक वेश्येचा खून झाला होता. त्यानंतर आता अत्याचाराच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Web Title: Atrocities on the premises of the vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.