सरूड येथील महिलेवर अत्याचार, आरोपीस सहा दिवसाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:50+5:302021-07-05T04:16:50+5:30

मलकापूर : सरुड (ता. शाहूवाडी) येथील विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी राहुल दत्तात्रय यादव ( वय ३५ ) याला अटक ...

Atrocities on woman in Sarud, accused remanded in custody for six days | सरूड येथील महिलेवर अत्याचार, आरोपीस सहा दिवसाची कोठडी

सरूड येथील महिलेवर अत्याचार, आरोपीस सहा दिवसाची कोठडी

Next

मलकापूर :

सरुड (ता. शाहूवाडी) येथील विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी राहुल दत्तात्रय यादव ( वय ३५ ) याला अटक करण्यात आली. संशयित आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. २७ वर्षीय पीडित महिलेने शाहूवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी राहुल यादव याला न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे .

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी राहुल दत्तात्रय यादव याने २७ वर्षीय फिर्यादी विवाहित महिलेला बदनामीची धमकी देऊन दीड वर्षांच्या कालावधीमध्ये वेळोवेळी अत्याचार केला. तसेच आक्षेपार्ह फोटो समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी ३० हजार रुपये उकळणे, संबंधास नकार दिल्यास मारहाण करणे, आत्महत्येची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याची फिर्याद पीडित महिलेने शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी राहुल यादव याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास निरीक्षक विजय पाटील करीत आहे.

फोटो ०४ राहुल यादव

Web Title: Atrocities on woman in Sarud, accused remanded in custody for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.