सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 08:45 PM2020-12-12T20:45:40+5:302020-12-12T21:35:08+5:30

Crimenews, police, kolhapurnews सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने शिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू धोंडीबा दळवी (वय ४७) या संशयित भोदूबाबाने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.

Atrocities on women under the pretext of getting gold treasure | सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Next
ठळक मुद्देसोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचारआजरा तालुक्यातील शिरसंगीच्या भोंदूबाबाचा प्रताप, चौघांविरुद्ध नेसरी पोलिसात गुन्हा

नेसरी/कोल्हापूर :  घरातील सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने शिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू धोंडीबा दळवी (वय ४७) या संशयित भोदूबाबाने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.

या प्रकरणी दळवी याच्यासह लक्ष्मण सुतार तसेच सावंतवाडी येथील दोघांविरुद्ध जादूटोणा व अघोरी कृत्य केल्याचा गुन्हा नोंद झाला असून शिरसंगीतील भोंदू बाळू दळवी याला अटक केली असून गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत नेसरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित महिला नेसरी येथे रहाते. फिर्यादीत तिने आपल्यावर डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० दरम्यान संशयित आरोपी बाळू दळवी याने माझ्याकडे दैवी व अलौकिक शक्ती आहे, मी बाळूमामाचा अवतार आहे असे म्हणून तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे, ती काढतो तसेच तुमच्या घरात सोन्याचा खजिना आहे तो मी तुम्हाला मिळवून देतो, त्यामुळे मी जे सांगतो तसे तुम्ही ऐका असे म्हणून आरोपी दळवीसह लक्ष्मण सुतार व सावंतवाडी येथील दोघांनी आपल्यावर अघोरी प्रकार करून जादूटोणा केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.

दळवी याने आपल्या घरी डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० दरम्यान संमतीशिवाय जबरदस्तीने शरीरसंबंध ठेऊन अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने नेसरी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी दळवी नामक भोंदूबाबाला नेसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

कृष्णकृत्याचा प्रताप

संशयीत बाळू दळवी हा स्वतःला संत समजत होता. भूलथापा देऊन अनेकाना त्याने फसविले असल्याची चर्चा आहे. त्याचे या उपविभागात अनेक भक्त असल्याचेही समजते. मात्र त्याच्या या कृष्णकृत्याचा प्रताप यानिमित्ताने दिसला आहे.

स्वयंघोषित देवर्षी

या स्वयंघोषित देवर्षी बाळू दळवी हा शिरसंगी येथील घरी संत बाळूमामा यांचा फोटो लावून बाळूमामांचे सच्चे भक्त असल्याचा दिखावा करत असे. अडीअडचणी सोडविण्यासाठी घरी येणाऱ्या गरीब लोकासमोर भोंदू बाळू दळवी हा दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करीत असे. हा पूर्वी जमिनीचे व्यवहार करत असल्याचे तर नेसरी जवळील एका खेड्यात बीयर बार चालवत होता अशीही चर्चा आहे.

Web Title: Atrocities on women under the pretext of getting gold treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.