व्यापाऱ्यावर हल्ला करून मोपेडसह रोकड लंपास

By admin | Published: September 15, 2015 01:33 AM2015-09-15T01:33:08+5:302015-09-15T01:33:08+5:30

शाहूपुरीतील घटना : लूटमारीमुळे पोलिसांची तारांबळ

The attack on the merchant and the cash lapsed with the mopeds | व्यापाऱ्यावर हल्ला करून मोपेडसह रोकड लंपास

व्यापाऱ्यावर हल्ला करून मोपेडसह रोकड लंपास

Next

कोल्हापूर : दुकान बंद करून मोपेडवरून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यावर दोघा लुटारूंनी हल्ला करून मोपेडसह रोख ५० हजार रुपये लंपास केले. शाहूपुरी लॉ कॉलेज परिसरात घडलेल्या या लूटमारीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अजित सोहनलाल कोठारी (वय ४५, रा. रुक्मिणीनगर) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, अजित कोठारी यांचे लक्ष्मीपुरी ते बिंदू चौक रस्त्याला लागून इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून ते मोपेडवरून घरी निघाले होते. शहाजी लॉ कॉलेजपासून काही अंतरावर गेले असता दोघा अनोळखी तरुणांनी त्यांना अडवून त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांची मोपेड घेऊन ते पसार झाले. मोपेडच्या डिकीमध्ये ५० हजार रुपये होते. गंभीर जखमी अवस्थेत कोठारी यांनी रस्त्यावरील नागरिकांना मदतीसाठी हाक दिली. नागरिकांनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तोपर्यंत जखमी कोठारी यांना नातेवाईकांनी कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रुग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अचानक घडलेल्या प्रकाराने ते बिथरून गेले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, या लुटारूंच्या शोधासाठी शहरातील सर्व पोलिसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. शहरातील सर्व चौकांत नाकाबंदी करण्यात आली परंतु लुटारूंचा माग लागला नाही. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The attack on the merchant and the cash lapsed with the mopeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.