उमळवाड येथे पोलीस पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:34+5:302021-05-07T04:27:34+5:30
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संचारबंदीच्या काळात अवैध व्यवसाय वाढत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारवाईचे सत्र ...
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संचारबंदीच्या काळात अवैध व्यवसाय वाढत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारवाईचे सत्र केले आहे. यातूनच उमळवाड येथे एका सराईत गुन्हेगारांकडून गेल्या काही महिन्यांपासून अवैधरीत्या गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने कारवाई करण्याकरिता तीन ते चार पोलीस कर्मचारी गेले होते. व्यवसाय करणाऱ्या सराईताने कारवाईकरिता आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हत्यार उगारले. या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, या याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. दरम्यान, अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांवर हल्ले होत असतील तर ही बाब गंभीर असून, पोलिसांनी अशा व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे.