कुटुंबीयांवर हल्ला करत मुलीस पळविले, कोल्हापुरातील वठार तर्फ वडगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:56 PM2023-09-30T13:56:15+5:302023-09-30T14:10:04+5:30

एकतर्फी प्रेमातून संशयित त्रास देत होता

Attacked the family and abducted the girl, Incident at Vadgaon near Vadhar in Kolhapur | कुटुंबीयांवर हल्ला करत मुलीस पळविले, कोल्हापुरातील वठार तर्फ वडगाव येथील घटना

कुटुंबीयांवर हल्ला करत मुलीस पळविले, कोल्हापुरातील वठार तर्फ वडगाव येथील घटना

googlenewsNext

पेठवडगाव : वडगाव पोलिस ठाणा हद्दीतील एका गावात आजोबांवर चाकूने खुनी हल्ला करून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या चाकू हल्ल्यातील वृद्ध अत्यवस्थ आहे.

संशयित व त्याच्या साथीदारांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो), खुनी हल्ल्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. याप्रकरणी ओंकार ऊर्फ चिक्या गजानन महापुरे (रा. वठार तर्फ वडगाव) यास अटक करण्यात आली. त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली.

घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार : पोलिस ठाणा हद्दीत पीडित मुलगी परिवारासह राहते. तिच्यावर एकतर्फी प्रेमातून ओंकार ऊर्फ चिक्या त्रास देत होता. अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न करणार अशी धमकी देत होता. याबाबत मुलीचे वडील व चुलते यांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, बुधवारी (दि.२७) रात्री नऊच्या सुमारास महापुरे, त्यांचे दोन अज्ञात साथीदार अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत होते. यावर तिच्या आजोबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापुरे याने चाकू हल्ला करत पोटावर वार केला. 

आजोबांवर वडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी झाल्यामुळे पुढील उपचारार्थ कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तिघांसह अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंड पाटील करीत आहेत.

Web Title: Attacked the family and abducted the girl, Incident at Vadgaon near Vadhar in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.