न्नृसिंहवाडीत आक्रमक महिलांचा दारूअड्ड्यांवर हल्लाबोल
By admin | Published: September 24, 2016 01:06 AM2016-09-24T01:06:07+5:302016-09-24T01:06:07+5:30
विक्रेत्यांच्या घरांसमोर फोडल्या बाटल्या : तीन ठिकाणी लाखोची दारू रस्त्यावर, तरूणांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील एचसीएमटीआर हा ३४ किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग विकसित करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीतील २-४-६ यानुसार व राज्य शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे भूसंपादन करण्यास शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेते मान्यता देण्यात आली.
शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने ३० वर्षांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातून ३४ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद वर्तुळाकार रस्ता (एचसीएमटीआर मार्ग) प्रस्तावित केला आहे. परंतु, या रस्त्यासाठी भूसंपादन आणि रस्त्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून पालिकेला एकाच वेळी इतका खर्च करता येणे शक्य नाही. शुक्रवारी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाने आता यासाठी टीडीआरचा उपाय अमलात आणता येणे शक्य होणार आहे.
खासगी जागामालकांसह, राज्य व केंद्र्र सरकारांच्या मालकीच्या अनेक जागा या रस्त्यात येतात. त्यामुळेच त्या ताब्यात घेण्यासाठी महापालिकेसमोर अनेक अडचणी येत होत्या.
डेव्हलपमेंट टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आबा बागुल यांनी दिला होता. विकास नियंत्रण नियमावलीतील नवीन तरतूद व राज्य सरकारने साधारण वर्षभरापूर्वी केलेल्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीचा लाभ उठवून या रस्त्यासाठी भूसंपादन आणि डांबरीकरण करावे, असे प्रस्तावात नमूद केले होते. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता भूसंपादनाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. (प्रतिनिधी)